पोलीस उप अधिक्षक पदाच्या दर्जाचा कोणताही पोलीस अधिकारी या अधिनियमाखाली अपराधाचा तपास करू पाकेल आणि या अधिनियमाखालील केलेला कोणताही अपराधा हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असेल तो प्राथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयाकडून न्याय चौकशी योग्य असेल. या अधिनियमाखालील केलेल्या कोपत्याही अपराधामध्ये न्यायालयाने दिलेल्या शिक्षेव्यतिरिक्त मालमत्तेचे नुकसान झाल्यास झालेल्या हानीबद्दल किंवा नुकसानीबद्दल न्यायालयाने निर्धारित केलेली नुकसान भरपाई देण्याचे दायित्व अपराध्यावर असेल व त्याला प्रसारमाध्यमातील व्यक्तीने केलेल्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देखील करावी लागेल. या अधिनियमाखाली अपराधा सिद्ध झालेल्या अपराध्याने त्याच्यावर लादलेली नुकसानभरपाई किंवा वैद्यकीय खर्च दिला नाही तर ती रक्कम जमीन महसूलाची थकबाकी होती असे समजून वसूल करण्यात येईल.
दखलपात्र आणि अजामीनपात्र