सतांची वाणी

आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ।।१।। झाडु संतांचे मारग । आडरानी भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवू ।।२।। अर्थे लोपली पुराणें । नाश केला शब्दाज्ञाने । विषयलोभी मनें । साधनें बुडविलीं ।।३।। पिटुं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जयजयकार आनंदें ।।४।। संत. तुकाराम महाराज