छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडून अभिवादन.......
लातूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास संसदीय कार्य, पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम व भूकंप पुनर्वसन राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी उदगीरचे प्रथम नागरिक तथा नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, तहसीलदार तहसिलदार व्यंकटेश मुंढे, नगरपालिका मुख्यधिकारी भरत राठोड, बस्वराज पाटील नागराळकर,सिध्देश्र्वर पाटील, गोपाळ कृष्ण धोडके प्रविण भोळे, कल्याण पाटील यांच्यासह शिवप्रेमी नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती उदगीर यांच्यावतीने उदगीर शहरात शिवजयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणूकीचे शुभारंभ राज्याचे पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम(उपक्रम)राज्य मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आला. विद्या वर्धनी हायस्कूलच्या प्रांगणातून सुरु झालेल्या या मिरवणूकीत उदगीर शहरातील विविध शाळेने सहभाग नोंदवला. या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक वेशभूषा केली होती. यावेळी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले.