छत्रपती शिवाजी महाराजांना पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून अभिवादन.

लातूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त लातूर शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.