महाराष्ट्र विद्यालयात एस.एस.सी परीक्षा प्रवीष्ठ विद्यार्थ्यांना निरोप .

महाराष्ट्र विद्यालयात लातूर : लातूरातील जेएसपीएम शिक्षण संस्था संचलित मजगे नगर येथील महाराष्ट्र विद्यालयात मार्च २०२० मध्ये एस.एस.सी.परीक्षेस प्रवीष्ठ होणार्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्य गोविंद शिंदे होते तर प्रमुख पाणे म्हणून एमआयडीसी पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री. संजीवन मिरकले हे उपस्थित होते. यावेळी मंचावर मुख्याध्यापक संजय बिरादार सर, प्रा. डी.एम. केंद्रे, उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी सर, सुर्यकांत चव्हाण, विनोद सुर्यवंशी, अफसर शेख, सा. राधा कवर मडम, आय सर, ढोक सर, ठोंबरे सर, यादव व्ही. एम., शख सरदार सर आदी मान्यवराची उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमा एस.एस.सी परीक्षा प्रवीष्ठ पुजनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून यशस्वी व्हावे - पो. नि. संजीवन मिरकले यावेळी बोलाताना पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या जगात यशस्वी होण्यासाठी भारतीय संस्कृतीमधील संस्कार मुल्यांचे जतन करावे व भरपूर अभ्यास करुन सकारात्मक दृष्टिकोन बाळगुण जीवनात यश मिळवावे. परिश्रमतातून मिळालेले यश हे चिरकाल टिकणारे असते. नियमित अभ्यास, व्यायाम व चांगले संस्कार हे जीवनाची शिदोरी असते.यासाठी आपण सदैव सकारात्मक विचार करुन पुढे जावे व १० वी च्या परीक्षेस यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा वचनबद्ध - प्राचार्य गोविंद शिंदे महाराष्ट्र विद्यालय हे अभ्यासक्रमीय शिक्षणाबरोबर मुल्यवर्धन करणारे संस्कारक्षम शिक्षण देणारी शाळा असून स्पर्धे च्या युगात सक्षमपणे टिकणार्या विद्यार्थ्यांबरोबरच नेतृत्वगुण आणि कौशल्य विकसीत करुन माणूस घडविणारी शाळा असल्याचे सांगून शाळेतील नवोपक्रमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यास शाळा वचनबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी सुर्यकांत चव्हाण, वेनुनाथ यादव, प्रा. डी.एम.केंद्रे आदींची व विद्यार्थी मनोगतेही संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मार्गदर्शन प्राचार्य गोविंद शिंदे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सत्रसंचलन अब्दुलगालीब शेख यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक अनिल सोमवंशी यांनी केले. सीब शेख ख्याध्यापक