रस्त्यावर भटकणाऱ्या तरुणांना पोलिसांनी उठाबशा काढायला लावल्या

पुणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या जनता कपर्युला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, समाजातील काही टवाळखोर विनाकारण रस्त्यावर घुटमळत आहेत. या टवाळखोरांना पोलिसांनी उठाबशा काढण्याची शिक्षा देत चांगलाच धडा शिकवला. संपूर्ण देशात कोरोना विरोधात जनता कपर्यु पाळला जात आहे. देशासह राज्यातील मोठी शहरं ते ग्रामीण भागातही सर्व नागरिक झ कपर्य त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून पाळत आहेत. राज्यातील प्रत्येक रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. कोरोनाला हरवायचं असेल, इतरांशी संपर्क टाळणे याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे, अत्यावश्यक सुविधा पुरवणारे सोडता इतर सर्व नागरिकांनी स्वतःला एका दिवसासाठी क्वारंटाईन केलं आहे. मात्र, अशापरिस्थितीत नागरिकांच्या या प्रयत्नांना गालबोट लावण्याचे काम काही समाजकंटक करताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातीस आंबेगावच्या मंचर येथील पुणे- नाशिक महामार्गावरील एसटी बस स्थानकाजवळ काही टवाळखोर रस्त्यावर फिरत होते.या फिरणाऱ्या युवकांना प्रेमानं उठाबशा काढण्याची शिक्षा देत मंचर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले .या शिक्षेमुळे अनेक टवाळखो रांना यातुन बोध मिळणार आहे. जनता कपर्दूला गालबोट, नाशकात दारुविक्री पिंपळगाव बसवंत येथे सर्रास दारुविक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने जनता कपर्युला गालबोट लागले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील पंजाब हॉटेलमध्ये हा धक्कादायक प्रकार सुरु आहे. स्थानिक पत्रकाराच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे समोर आलं. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी | जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत दारुविक्री बंदचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नाशकात सर्रास दारुविक्री सुरु आहे. आज जनता कप! कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कपर्यु पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना एक दिवसजनता कपर्य पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कपर्युच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि | |कार्यालयांना टाळं असणार आहे.