छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा पोलिसांवर मोठा हल्ला १४ जवान जखमी, १३ बेपत्ता

पोलिसांवर मोठा हल्ला पोलिसांवर मोठा हल्ला १४ जवान जखमी, १३ बेपत्ता


छत्तीसगड : सीआरपीएफ आणि डीआरजी पोलिसांकडून काल रात्री (२१ मार्च) सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा पोलीस स्टेशन अंर्तगत असणाऱ्या बुर्कापाल जंगलात कोंबिंग ऑपरेशन सरु होतं. यावेळी नक्षलवाद्यांनी कोंबिंग ऑपरेशनमध्ये असणाऱ्या १५० जवानांवर अचानक | हल्ला केला. त्यामुळे पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु झाली.या चकमकीत पाच नक्षलवादी जिल्ह्यातील ठार झाले तर १४ जवानजखमी झाले आणि १३ जवान बेपत्ता आहेत. बेपत्ता जवानांसाठी शोध मोहिम सुरु आहे. दरम्यान, पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक तासभर सुरु राहिली. पोलीस दलावर वाढता दबाव पाहून पोलिसांनी जिल्हा मुख्यालयी संपर्क साधला. त्यानंतर थोड्या वेळात घटनास्थळी पोलिसांचे हेलिकॉप्टर दाखल झाले. हवेत हेलिकॉप्टर बघताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात १४ जवान जखमी झाले असून त्यापैकीदोघांची प्रकृती नाजूक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सर्व जखमी जवानांवर रायपूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन वर्षांपूर्वीदेखील सुकमा जिल्ह्यातील बुर्कापाल जंगल परिसरातच २०० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ टीमवर हल्ला केला होता. सीआरपीएफची एक तुकडी गस्त घालत असताना बापाल जंगलात दबा धरुन बसलेल्या नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात २५ जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. अँकर्सनी